आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Robber Was Living In Aurangabad After Plastic Surgery

बँकफोड्याच्या बारा भानगडी, प्लास्टिक सर्जरी करून औरंगाबादेत वास्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील बहुतेक जिल्हा बँका व पतसंस्थांवर दरोडे टाकणार्‍या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. औरंगाबादसह बीड, नगर, पुणे, सोलापूर, अमरावती, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी टोळीने बँका फोडल्या आहेत. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही लुटालूट केली आहे. टोळीचा म्होरक्या सुरेश काशीनाथ उमक (48, रा.कमळापुर, जि. अमरावती) तीन वर्षांपासून प्लास्टिक सर्जरी करून औरंगाबादेत वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. अलीकडे नागपुरात त्याला अटक करण्यात आली. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विजयकुमार मगर यांनी गुरुवारी ही माहिती दिली.


देवळाईत रो-हाऊस
सुरेशने प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. देवळाईत रो हाऊसमध्ये तो राहत होता. ओम ऊर्फ सागर देशमुख नावाने तो आयकर अधिकारी, कंत्राटदार, डॉक्टर असल्याचे सांगायचा. त्याच्या घरात गावठी कट्टा सापडला आहे.


प्रेमविवाह 3 दिवसांचा
सुरेश उमक औरंगाबादेतील तरुणीच्या प्रेमात पडला होता. 2010 मध्ये त्याने तिच्याशी लग्नही केले. घरी विरोध झाल्याने तीनच दिवसांत त्याने पत्नीला घराबाहेर काढल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

औरंगाबाद, बीडमध्ये बँकफोडी : ०माळेगंगा सहकारी बँकेतून 9 लाख ०नगर बॅँकेच्या ढवळगाव शाखेतून
32 लाख ०कोपरगाव शाखेतून 13 लाख ०वैनगंगा बॅँकेतून सिंधुदुर्गमध्ये 28 लाख, तर रत्नागिरीत 40 लाख
०बीड जिल्हा बॅँकेत 2 लाख ०रत्नागिरीच्या लांजे शाखेत 3 लाख ०औरंगाबाद जिल्हा बॅँकेतून 70 हजार लूट.