आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Cant Read Indian Constitution , Subramanyam Said

भारताची राज्यघटना ओबामांनी बारकाईने वाचलेली नाही- सुब्रह्मण्यम स्वामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या भारत दाैऱ्यामुळे २००६ पासून अडकलेल्या अणुकराराचा तिढा सुटला व आपल्यावरील बंधने समाप्त झाली. आतंकवाद विरोधी लढाईत सहभागी होऊन जगातील दोन लोकशाही असलेले देश एकत्र आले. मात्र, ओबामा यांनी जाताना जे सद््भावनात्मक भाषण केले ते योग्य नव्हते. आपल्या संविधानानुसार सर्व धर्म सद्भावना, कायदा-सुव्यवस्था, नैतिकता, स्वास्थ्य या गाेष्टींची अंमलबजावणी होत आहे. भाषण करण्यापूर्वी त्यांनी भारताचे संविधान वाचलेले नाही, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या जाहिरातीतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी शब्द वगळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वामी म्हणाले, हे शब्द मूळ संविधानातील नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांनी ते संविधानात आणले नाहीत, तर इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये त्यांचा समावेश केला.

न्यायालयाच्या निर्णयानुसार संविधानाच्या मूळ स्वरूपात अशा प्रकारे काेणताही बदल करता येत नाही. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर व नरसिंह राव सरकारच्या काळात ‘समाजवाद’ शब्दनिरुपयोगी झाला आहे. तो शब्द संविधानाच्या उद्देशपत्रिकेत आहे किंवा नाही याचा फरक पडत नाही. काँग्रेसकडे दुसरा काेणताही विषय नसल्याने ते या विषयावर वाद घालत आहेत, असे मत स्वामी यांनी या वेळी व्यक्त केले.
अण्णा, आंदोलन कराच
अण्णा हजारे हे पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असून त्यांनी ते करावे. कारण, त्यांची ती भूमिका आहे. मात्र, आंदोलन मध्येच सोडून त्यांनी जाऊ नये. लोकपालबाबत वित्तमंत्र्यांची दुसरी भूमिका असून ते त्याबाबत विचार करत आहेत. मोदी सरकारला आठ महिनेच झाले आहेत. भ्रष्टाचार संपवणे व काळा पैसा भारतात परत आणून त्यावर उपाययोजना करणे त्यांच्या डोक्यात असून या वर्षांच्या शेवटपर्यंत त्यावर निर्णय होईल, असे स्वामी म्हणाले.