आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baramati Court Ordered To Starts Inquiry Against Ajit Pawar, Divya Marathi

धमकीप्रकरणी अजित पवारांची बारामती न्यायालयाने चौकशी केली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी मासळवाडी येथे भाषण करताना सुप्रिया सुळेंना मतदान न केल्यास २३ गावांचे पाणी बंद करू, असे धमकीवजा वक्तव्य केले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी पवारांना क्लीन चिट दिली होती. पण बारामती न्यायालयाने त्यांची चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पवारांच्या १६ एप्रिल रोजीच्या भाषणाची चित्रफीत आपल्याकडे असून ती न्यायालयात चार नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी सादर करणार आहोत. पवारांनी मतदारांना दमबाजी करून पाणी बंद करून शेतक-यांचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार आपण वडगाव निंबाळकर चौकीत तक्रार दाखल केली, असे खोपडे यांनी स्पष्ट केले.