आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baramati Crime News, Women Threatening At Baramati

बारामतीतील घटना: अवैद्य दारूविक्रेत्यांकडून महिलेचा मारहाण करून विनयभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत दारूबंदीची मागणी केल्याचा राग मनात धरून दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलेला प्रजासत्ताक दिनी (सोमवारी) अवैद्य दारूविक्रेत्यांनी भररस्त्यात महिलेचा विनयभंग करत गंभीर मारहाणीचा प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव बु. गावात घडला. पिडीत महिला ही गावात अंगणवाडी कार्यकर्ती असून प्रजासत्ताक दिनी अंगणवाडीतील मुलांना खाऊ घेऊन दुचाकीवरून जाताना रस्त्यात अडवून अवैद्य दारूधंदे करणाऱ्या महिला पुरूषांनी तिच्यावर हल्ला केला. त्यावेळी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा सुरू होती.
पूर्वी अवैद्य दारूविक्री करणाऱ्या कुटुंबातील दोन महिला व दोन तीन पुरूषांनी महिलेचा मारहाण करताना साडी ओढत विनयभंग केला. शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी माळेगावकडे धाव घेत पिडीत महिलेची विचारपुस केली. त्यांनी घटनेचा कडक शब्दात निंदा करून पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी पद्मिनी शहाजी गव्हाणे, अमोल शहाजी गव्हाणे, शहाजी भगवान गव्हाणे यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात विनंयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.