आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baramati Ready For Welcoming To Pm Modi, Ajit Pawar Seen Each & Everything

पंतप्रधान आज बारामतीत: मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी, पाहा फोटो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौ-यावर येत आहेत. यात ते चाकण, बारामती व मुंबई अशा तीन ठिकाणी भेटी देतील. असे असले तरी शरद पवारांच्या बारामतीतील मोदींच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या दिवसातील बहुंताश वेळ मोदी बारामतीत घालवणार आहेत. मोदी बारामतीतील प्रसिद्ध विद्या प्रतिष्ठान, शारदानगर तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावतील. याचबरोबर एका छोट्या समारंभात शेतक-यांशी संवाद साधतील. मोदींच्या स्वागतासाठी बारामती सज्ज झाली आहे.
देशाचे पंतप्रधान बारामतीत येत असल्याने बारामती स्वच्छ केली आहे तसेच सजविलीही आहे. यात काहीही त्रुटी राहू नये म्हणून शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांवर या सर्व नियोजन तयारीचे काम सोपवले आहे. मोदी यांच्या दौ-यातील व्यवस्थापन- नियोजनाची जबाबदारी शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवल्यामुळे अजितदादा स्वतः बारामतीत मुक्काम ठोकून प्रत्येक कामावर जातीने लक्ष देत आहेत. सर्व बारीक-सारीक बाबींची पाहणी करून जिथे काही त्रुटी दिसत असतील तर इतरांना कामाला लावत आहेत.
पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी मोदींसाठी असेल खास मराठी मेन्यू-
‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर बारामतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खास मराठामोळ्या मेजवानीचा बेत आखला आहे. झुणका-भाकर आणि ठेचा असा झणझणीत बेत मोदींसाठी निश्चित करण्यात आला आहे. मोदींसाठी ज्वारी, बाजरीची भाकरी, झुणका (पीठलं), वांग्याची भाजी, मेथीची भाजी, मिरची ठेचा, लसूण चटणी, गव्हाची खीर असा मेन्यू असणार आहे.
पंतप्रधान मोदींचा बारामतीचा दौरा असा असेल..
- सकाळी 7.20- दिल्लीहून पुण्याकडे प्रयाण
- 9.00 - पुणे विमानतळावर आगमन
- 9.10 - हेलिकॉप्टरने चाकणकडे प्रयाण
- 9.30 - चाकणमध्ये जनरल इलेक्ट्रीकल्स प्रकल्पाचे उद्घाटन
- 10.45 ला हेलिकॉप्टरने बारामतीकडे प्रयाण
- 11.40- बारामती एअरपोर्टवर आगमन
- 11.50 ला विद्या प्रतिष्ठान संस्थेस भेट
- 12.10 - भिगवण रस्त्याने माळेगावकडे प्रयाण
- 12.20- अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन समारंभ
- 12.40- कृषी विज्ञान केंद्राची पाहणी
- 1.00- वाजता सेंटर फॉर एक्सलन्स इमारतीचे भूमीपूजन
- 1.10- शेतकरी मेळावा भाषण
- 2.00- शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन
- 2.30- हेलिपॉप्टरने पुणे एअरपोर्टकडे रवाना
- 3.30- पुण्याहून मुंबईकडे रवाना
बारामतीत अजित पवार जातीने घालताहेत लक्ष, यादरम्यान अजित पवारांची टिपलेली छायाचित्रे... पाहा...