आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीत बँकेत जुन्या नोटा भरण्यासाठी रांगा, उमेदवारांनी जुन्या नोटा मतदारांना वाटल्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर तसेच बँकेत जुन्या नोटा भरण्यासाठी दोन्ही ठिकाणी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, उमेदवारांनी त्यांच्याकडील नोटा मतदारांना दिल्याची चर्चा शहरात होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर बारामती शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये नोटा भरण्यासाठी रांगा लागत होत्या. त्यानंतर जुन्या नोटा भरण्याचा ओघ ओसरला.
मात्र, बारामती नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती परिसरातील बँकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चलनातून रद्द झालेल्या नोटा भरण्यासाठी अचानक गर्दी उसळली आहे.
जुन्या नोटा भरणाऱ्यांमध्ये सर्व स्तरांतील लोक होते. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. तर काही राष्ट्रीयीकृत बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी स्वतंत्र खिडक्या उघडाव्या लागल्या.
३ ते १० हजारांपर्यंत भरणा
सर्वसामान्य नागरिक आपल्या बचत खात्यामध्ये ३ हजार ते १० हजार रुपये भरत होते, तर काही जण पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा भरताना आढळून आले.
दरम्यान, निवडणुकीची संधी साधून उमेदवारांनी आपल्याकडील नोटा खपवल्याचे काही जणांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...