आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामती: कट्ट्यातून गोळी झाडून तरुणीची आत्महत्या, काैटुंबिक नाराजीतून कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - कुटुंबीयांकडून अापले लाड पुरवले जात नाहीत,  आपल्याबाबत दुजाभाव केला जातो, असा तक्रारीचा सूर अाळवणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने चक्क गावठी पिस्तुलातून गाेळी झाडून अात्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री बारामती शहरात घडली.  मृत तरुणीचे वडील लष्करी सेवेत कार्यरत आहेत. सायली मानसिंग बळी (वय १७, रा. सूर्यनगरी, बारामती) असे मृत तरुणीचे नाव अाहे.  
 
मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे रहिवासी असलेले मानसिंग बळी हे सध्या देशसेवेसाठी सिक्कीम येथे तैनात अाहेत.  आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी पत्नीसह सायली व तिचा लहान भाऊ यांची बारामती येथील सूर्यनगरी येथे राहण्याची साेय करून दिली. सायली ही विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत हाेती. मात्र, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तिने अापल्या घरातच अात्महत्या केली. कुटुंबीयांनी गाेळी झाडल्याचा अावाज एेकताच तातडीने धाव घेत सायलीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.  

गावठी कट्टा कोणाचा?  
सायलीने गावठी कट्ट्यातून आपल्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, तिच्या घरी नेमके हे बेकायदा पिस्तूल अाले कुठून? असा प्रश्न पाेलिसांना पडला अाहे. सायलीचे वडील लष्करी सेवेत अाहेत. अशा व्यक्तीच्या घरी बेकायदेशीर पिस्तूल अाले कुठून? याबाबत सखाेल चाैकशी केली जात अाहे.  
बातम्या आणखी आहेत...