आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Baramati's Industraliist Eye On Uajjani Dam Water; Council Cooperate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उजनी धरणाच्या पाण्यावर बारामतीच्या उद्योगाचा डल्ला ; नगरपालिकेचे सहकार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बारामती - सोलापूरची तहान भागवण्यासाठी राखून ठेवलेल्या उजनी धरणातील मृत जलसाठ्यावर बारामतीच्या एका बड्या दुधप्रक्रिया उद्योगाचा डोळा आहे. या धरणाचे पाणी उद्योगाकडे वळविण्याचा घाट पालिकेने घातला असल्याचे सोमवारी उघड झाले.

बारामती नगर परिषदेने 6 एप्रिल 2009 रोजी उजनी धरणातील पाणी शहराला देण्याची योजना सुरू केली. मात्र बारामतीकरांना हे पाणी पचनी पडले नाही. त्यांनी ही योजना बंद करून नव्याने निरा डावा कालव्यातून पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे उजनी धरणावरील पाणी योजना अडगळीला पडली. सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बारामती औद्योगिक वसाहतीला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद पडण्याची दाट शक्यता आहे. त्यावर वेळीच सावध होऊन श्रायबर डेअरीचा उजनीतील पाणी योजनेवर डल्ला मारण्याचा मनसुबा सोमवारी उघडकीस आला आहे.

विरोधकही सामील
बारामती पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्यासाठी उजनी धरणावरील पंपगृह, पाईपलाईन, जलशुध्दीकरण केंद्र ही यंत्रणा भाडेपट्ट्याने श्रायबर डेअरीला देण्याचा प्रस्तावाला सोमवारी विरोधी पक्ष व सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली.