आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार्टीचे ‘समतादूत’ राखणार सामाजिक सलोख्याचे वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सामाजिक सलोखा व बंधुभावाची भावना वाढीस लावण्याच्या हेतूने बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (बार्टी) राज्यात ‘समतादूत’ प्रकल्प हाती घेतला आहे. सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय खर्‍या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साधता येणार नाही. त्यामुळेच जातीय विद्वेष पसरवणार्‍या कारणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकांच्या प्रबोधनाची गरज आहे. समतादूत समाजप्रबोधनाचे काम करणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार यांनी दिली.
‘समतादूत’ प्रकल्पात सर्व जातीधर्माच्या स्त्री-पुरुषांनी सहभागी व्हावे. समता आल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकणार नाही. म्हणून देशसेवेची भावना असलेल्यांनी या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन परिहार यांनी केले. इच्छुक लोकांना ‘समतादूत’ होण्यासाठी मास्टर, ट्रेनर, प्रशिक्षक असे गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राज्यघटनेतील तत्त्वे आदींवर प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.

समतादूत होण्यासाठी
कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्ती ‘समतादूत’ होऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज, योग्य कागदपत्रांसह पोस्टाने अथवा ईमेलद्वारे www.barti.maharashtra.gov.in या पत्त्यावर पाठवावा. बार्टीच्या www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अ‍ॅप्लिकेशन फॉर्म फॉर प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रॉसिटीज-ट्रेनिंग कम वर्कशॉप या लिंकवर अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.