आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Basketball Player Died In Ground During The Playing Match

पुणे: BMCC कॉलेज मैदानावर बॉस्केटबॉल खेळाडूचा खेळताना मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अक्षय भोसले
पुणे- पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर खेळताना एका 24 वर्षीय बॉस्केटबॉल खेळाडूचा मृत्यू झाला. आज सकाळी मैदानात बॉस्केटबॉल खेळताना या बॉस्केटबॉलपट्टूचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. अक्षय भोसले असे या खेळाडूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भोसले सकाळी 8 वाजता वॉर्मअप करीत होता. त्यानंतर तो मैदानात उतरला. बॉस्केटबॉलचा किरकोळ सराव करताना त्याला चक्कर आली व तो खाली कोसळला. मैदानातील त्याच्या सहका-यांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला काही वेळात मृत घोषित केले.
अक्षय याचा मृत्यू नेमका कशाने झाला ते अद्याप समजले नाही. मात्र, ह्दयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.