आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात होळीच्या पूर्वसंध्येला प्रेमीयुगुलाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील भोसरी भागात एका प्रेमीयुगुलाने होळीच्या पूर्वसंध्येला आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेयसीला गळफास लावून त्यानंतर प्रियकाराने स्वत: आत्महत्या केली. कुटुंबीयांचा त्यांच्या विवाहाला विरोध असल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. इतिश्री स्वाईन आणि राजमुकर स्वाईन अशी दोघांची नावे आहेत. हे प्रेमी जोडपे आसाममधील राहणारे आहे.

राजकुमार आणि इतिश्री हे दोघेही सिंहगड इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दोघांनी आपापल्या पालकांना ते आत्महत्या करत असल्याचा एसएमएस केला होता, असे पोलिसांनी सांगितले. राजकुमार याने आणि इतिश्री हीला गळफास लावला आणि त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजकुमारचे कुटुंबीय आसाम येथे गेल्यानंतर 19 मार्चला इतिश्री त्याच्या घरी राहायला आली होती. गेले सात दिवस ते सोबतच राहत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.