आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बेडेकर यांच्या संशोधनामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठी अभियंते विक्रम बेडेकर यांनी धातूशास्त्रीय संशोधन यशस्वी केले असून त्यामुळे यंत्रांमधील बेअरिंगचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना पीएच.डी. प्रदान केली आहे.

बेअरिंग निर्मितीत आघाडीवर असलेल्या टिमकेन कंपनीत डॉ. विक्रम अधिकारपदावर काम करतात. या कंपनीने त्यांना या संशोधनासाठी साह्य केले होते. बेअरिंगचे आयुष्य किती राहील हे ज्या कारणांमुळे ठरते त्यात मूळ पोलादाचा दर्जा, त्याला दिलेले तापमान, त्याचे कोन आदींप्रमाणेच निर्मिती प्रक्रियेतील हार्ड टर्निंग व ग्राइंडिंगमुळे होणारे परिणाम हे एक महत्त्वाचे कारण असते. डॉ. बेडेकर यांनी हार्ड टर्निंगमळे पृष्ठभागालगतच्या धातूकवचात होणार्‍या परिवर्तनांचा अभ्यास केला. या परिवर्तनांचे मोजमाप करणे शक्य झाल्यामुळे ती पर्याय प्रमाणातच नियंत्रित करणे शक्य होईल. त्यामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढविता येईल. औद्योगिक कामकाजात बेअरिंगच्या वापराचा व्याप पाहिला तर त्यांचे आयुष्यमान वाढविण्याची कोणतीही शक्यता मोठी बचत घडविते.

बेडेकर यांना या संशोधनासाठी प्रो. राजीव शिवपुरी यांनी मार्गदर्शन केले. बेडेकर यांनी आपली नोकरी सांभाळून हे संशोधन केले आहे. बेडेकर यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण येथे झाले असून पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून त्यांनी अभियंत्रिकीची पदवी मिळविली होती.