आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEWS @ MH: बीड जिल्ह्यात 7 वर्षीय मुलीचा नरबळी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या ठिकाणाहून बेपत्ता असलेल्या ईशा मौर्या या 7 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह एका शेतात आढळून आला आहे. तसेच हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे. ईशाच्या डोक्यावरील केस कापल्याने व शीर धडापासून वेगळे केल्याने नरबळीचीच घटना असल्याचे पुढे येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.
गेवराई शहरातून दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास ईशा घरापासून काही अंतरावर खेळत असताना अचानक गायब झाली होती. याबाबत तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, ईशाचा शोध लागत नव्हता. अखेर सोमवारी दुपारी काही मुले शेतात गेल्यानंतर तेथे ईशाचा जमिनीत अर्धवट स्थितीत पुरलेला मृतदेह आढळून आला. मुलांनी ही माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले. त्यावेळी ईशाच्या डोक्यावरील केस कापलेले आढळून आले होते. तसेच तिचा गळा कापून शीर धडापासून वेगळे केल्याचे दिसून आले. ईशाच्या अंगावर भाजलेल्या खुणा दिसत होत्या. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा अंदाज पोलिसांनी काढला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही तसेच कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातही अशीच एका घटना होताना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका 2 वर्षीय चिमुकल्याचा बळी देण्याचा डाव उधाळून लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.
(छायाचित्र- प्रतिकात्मक)
पुढे वाचा, अभिनेत्री मानसी नाईक हिच्याविरोधात खटला...