आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed Very Cold Compare To Mahabaleshwar, Temperatur Recorded 9.40 C

राज्‍य गारठलेः महाबळेश्वरपेक्षाही बीड ठरलय थंड; पारा 9.40

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात थंडीचा कडाका वाढत असून कोकण किनारपट्टी व आंध्र-कर्नाटकच्या सीमेवरील राज्याचा भाग वगळता इतरत्र तापमान 15 अंश सेल्सियसपेक्षा कमी झाले आहे. गेल्या 24 तासांत बीड येथे राज्यातील सर्वात कमी 9.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमधील नीचांकी तापमान 13 अंश होते हे विशेष.
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, मध्य महाराष्‍ट्र व विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. पुढील 24 तासांत राज्यातील हवामान मुख्यत: कोरडे राहील. देशाच्या पठारी भागातील सर्वांत कमी तापमान आदमपूर (पंजाब) येथे 6 अंश होते.
गेल्या चोवीस तासांत तापमान
पुणे 9.9
नाशिक 9.7
नगर 10.3
यवतमाळ 10.8
औरंगाबाद 11.6
परभणी 11.7
मालेगाव 12
नांदेड 12
वर्धा 12.1
उस्मानाबाद 12.2
जळगाव 12.5
अकोला 12.5
अमरावती 12.8
नागपूर 13
वाशीम 13.8
चंद्रपूर 14.5
सोलापूर 17
मुंबई 23.5