आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संजय दत्तला येरवडा जेल अधिका-यांकडून मिळतेय खुलेआम बिअर व दारू\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुर/ पुणे- मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तवर जेलमधील अधिकारी मेहरबानी करीत असल्याचे पुढे येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दावा केली आहे की, संजय दत्तला जेलमध्ये जेल अधिकारी व पोलिस कर्मचारी खुलेआम बिअर व दारूच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तावडेंनी हा ही आरोप केला की, प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून त्याला सॉफ्ट कॉर्नर देण्याबाबत सांगितले जात आहे. संजय दत्तला दोन महिन्यात दोनदा 30-30 दिवसाचा पॅरोल दिल्यानंतर राज्यसरकारही संजय दत्तवर मेहरबानी करीत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. त्यामुळे सरकारपाठोपाठ आत प्रशासनही संजयवर मेहरबानी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत नियम 260 नुसार राज्यातील महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराबाबत दाखल केलेल्या प्रस्तावावर बोलत होते. जवळपास एक तासाच्या भाषणात तावडे यांनी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांवर कडक नजर ठेवली जाते. मात्र, जेल अधिकारी व कर्मचारी संजय दत्त व शक्ती मिलमधील पत्रकार महिलेवर सामूहिक बलात्कार करणा-या आरोपींना जेलमध्ये खास सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आज राज्यात गुन्हे केल्यानंतरही 93 टक्के गुन्हेगार बाहेर खुलेआम फिरत आहेत. पोलिस कोठडीत राहणारे कैदीच बलात्कार आणि अत्याचारासारख्या घटनांत आरोपी म्हणून पुढे आले आहेत.