आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Journalist Award To Vaishali Karole Divyamarathi.com

\'दिव्य मराठी\' ऑनलाइनच्या वैशाली करोले यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद- ‘सलाम पुणे’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'उत्कृष्ट पत्रकारिता युवा पुरस्कार' ‘दिव्य मराठी’ ऑनलाइनच्या वैशाली नेमाड-करोले यांना जाहीर झाला आहे. येत्या 3 जानेवारीला पुणे येथील नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात दुपारी चार वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रीय संत भैयुजी महाराज यांना ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
उल्लेखनिय म्हणजे 'दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर, उदय टिकेकर, उदय सबनीस इत्यादी कलावंत या कार्यक्रमास उपस्थिती देणार असल्याचेही आयोजकांनी कळवले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना 'सलाम पुणे' संस्थेतर्फे पुरस्कार दिले जातात.

असे जाहीर झाले पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 'सलाम पुणे' पुरस्कार 'दुनियादारी', 'सलाम पुणे' हा पुरस्कार- प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक विश्वास पाटील, युवा कार्यकर्ता -'सलाम पुणे' पुरस्कार -आशिष साबळे, 'सलाम पुणे' पुरस्कार- प्रा.फुलचंद चाटे, उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल 'सलाम पुणे 'पुरस्कार १) नंदकुमार सुतार ,संपादक- सकाळ ,पुणे २) अभय दिवाणजी , सकाळ, सोलापूर, उत्कृष्ट पत्रकारिता युवा पुरस्कार १) वैशाली करोले ,दिव्य मराठी ऑनलाइन-औरंगाबाद, २)रोहित गोळे ,महाराष्ट्र टाईम्स- मुंबई, ३) विश्राम वैद्य, दूरदर्शन-पुणे ४) सागर आव्हाड TV 9 महाराष्ट्र- पुणे, ५) शिरीष कुलकर्णी ,सातारा