आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन भरवणारे टोळभैरव; नेमाडे यांचा प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘कुठल्याशा बेटावर चार मराठी माणसे आहेत, असे समजले तर ही मंडळी तिथेही जाऊन संमेलन घेतील. हे लोक टोळभैरव असतात. उत्सव करण्यासाठी शत्रूचा पैसा घेऊनही हे काम चालवतील. अशांचे संमेलन म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आहे’, अशा शब्दांत ‘कोसला’कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तोफ डागली. शुक्रवारी नेमाडे यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.