आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhatkal Was Starting Second Terrorist Squad, Email Of Himayat

अतिरेक्यांची दुसरी तुकडी उभी करत होता भटकळ, हिमायत, जबीच्या मेलमध्ये उल्लेख

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लष्कर-ए-तोयबा संघटनेचे काम करत असलेला मिर्झा हिमायत बेग व इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी जबिउद्दीन अन्सारी (जबी) या दोघांच्या ई-मेलमधील संभाषणात कुख्यात अतिरेकी यासीन भटकळचा उल्लेख दहशतवादविरोधी पथकास (एटीएस) आढळून आलेला आहे. भटकळ हा अतिरेक्यांची दुसरी फळी देशात कार्यरत करण्यासाठी जिहादच्या नावावर बेरोजगार तरुणांना भडकवत असल्याचे तपासात समोर आल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले. सिमीचा सदस्य व मूळचा काश्मीरचा असलेला अस्लम काश्मिरी हा सर्वप्रथम मराठवाडयात 2004-05 मध्ये औरंगाबादला आला. त्याने लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्क मराठवाड्यात पसरवण्यासाठी स्थानिक बेरोजगार तरुणांना सिमीच्या जाळ्यात ओढले. यादरम्यान 2006 मध्ये मराठवाडयात काही विशिष्ट कट्टरपंथी संघटनांकडून बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यामुळे समाजातील एका विशिष्ट धर्मावर हल्ला होत असल्याचे चित्र निर्माण होऊन काश्मिरीला त्याचे नेटवर्क पसरवण्यास पोषक वातावरण तयार झाले. यातूनच फय्याज कागझी, हिमायत बेग, जबिउद्दीन अन्सारी आदी मंडळी जिहादकरिता त्यातून निर्माण झाली. हिमायत बेग हा सन 2008 मध्ये यासीन भटकळच्या संपर्कात होता व त्याने नाशिक येथील पोलिस अकादमीची रेकी केली होती.


टुंडा, भटकळ महत्त्वाचे
विविध स्फोटात सहभागी असलेल्या अब्दुल करीम टुंडा व यासीन भटकळ यांना ‘एनआयए’ने नुकतेच अटक केली. इंडियन मुजाहिद्दिनचे इतर साथीदार, स्लीपर सेल नेटवर्क, अर्थिक स्त्रोत ही माहिती ‘एटीएस’साठी महत्वूपर्ण ठरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.