आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी हेच गणेशाेत्सवाचे जनक’, ...तर ट्रस्ट हायकाेर्टात जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सार्वजनिक गणेशाेत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली पुण्यात केली. त्यामुळे सार्वजनिक गणेशाेत्सवाचे यंदा १२६ वे वर्ष चालू असताना, राज्य शासन व पुणे मनपा यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास करून, यंदाचे गणेशाेत्सवाचे १२५ वे वर्ष असल्याचे जाहीर करण्यात अाले अाहे. भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशाेत्सवाचे जनक असून लाेकमान्य टिळक यांनी त्यानंतर सार्वजनिक गणेशाेत्सव प्रचार व प्रसाराचे काम केले अाहे. मात्र सरकार हे मान्य करत नाही, ही खेदाची बाब अाहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त सूरज रेणुसे व अॅड. मिलिंद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   
 
रेणुसे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्यसैनिक चरित्रकाेशात भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केल्याचे नमूद करण्यात अाले अाहे. भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी सन १८९२  मध्ये सार्वजनिक गणेशाेत्सवाची स्थापना व सुरुवात केली हे स्वयंस्पष्ट व सिद्ध झालेले अाहे. गणेशाेत्सवाला अामचा विराेध नसून श्रेयवादाची ही लढार्इ नाही. मात्र, रंगारी यांचा सन्मान व अादर राखला पाहिजे व त्यांचे मृत्युपत्रातील इच्छेनुसार सार्वजनिक गणेशाेत्सवास त्यांच्या नावाने जाहीर करण्यात यावे, अशी अामची मागणी अाहे. त्यांच्या नावाने कायमस्वरूपी स्वागत कमान व प्रवेशद्वार शनिवारवाड्यामागे व लालमहालाजवळ उभारणे अावश्यक अाहे. तसेच त्यांचा पुतळा मंडर्इ अथवा अल्का टाॅकीज चाैकात उभारण्यात यावा, त्याचा सर्व खर्च ट्रस्ट द्यायला तयार अाहे.’  
 
टिळकांचे कार्यही माेठेच
ट्रस्टचे सचिव राजेंद्र गुप्ता म्हणाले, सार्वजनिक गणेशाेत्सवाची नेमकी सुरुवात कशी झाली याबाबत अभ्यास करण्यासाठी शासनाने समितीमार्फत चाैकशी करावी.  अभ्यासक्रमात टिळकांनी गणेशाेत्सव सुरू केला असा उल्लेख अाहे, त्याएेवजी रंगारी हे सार्वजनिक गणेशाेत्सवाचे जनक अाहे, असा बदल करावा. पुरावे ज्याप्रकारे उपलब्ध हाेतात त्यानुसार इतिहासात बदल करणे अावश्यक अाहे. टिळकांनी गणेशाेत्सव सर्वत्र पसरविला याबाबतचे त्यांचे कार्य अाम्ही नाकारत नाहीच.’   
बातम्या आणखी आहेत...