आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला धमकीचे पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे सन १८९२ मध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना करणारे भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या सभासदांना शुक्रवारी निनावी धमकीचे पत्र मिळाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात सूरज प्रकाश रेणुसे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समाजासमोर आणला जात आहे. काही महत्त्वाचे जुने दस्तऐवज शोधून काढण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी इतिहास कालीन शस्त्रांचे संग्रहालयाचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. हेच काही जणांना आवडले नाही. त्यामुळेच मंडळाला धमकीचे पत्र मिळाल्याचे रेणुसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दररम्यान, मंडळाचे खजिनदार अनंत माधव कुसुरकर यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र पाठवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चौकशी करून आरोपींना अटक करावी,अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी बोलताना केली आहे. या मंडळाला पुण्यातील अनेक गणेश मंडळ पुणेकर नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...