आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींना नथुरामाच्या पहिल्या हल्ल्यातून वाचवणारे भिलारे गुरुजी यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी अामदार भिकू दाजी भिलारे (९७) यांचे बुधवारी पहाटे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. महात्मा गांधी यांच्यावर पाचगणी येथे नथुराम गोडसे याने सर्वप्रथम हल्ला केला तेव्हा भिलारे गुरुजी यांनी गांधीजींना वाचवले हाेते.

गुरुजींवर बालपणापासूनच महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव हाेता. तरुणपणापासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही माेठे याेगदान दिले. महात्मा गांधीजींनी महाबळेश्वर येथे येऊन गुरुजींच्या कार्याचा गाैरव केला हाेता. सातारा जिल्ह्यातील जावळी मतदारसंघातून दाेन वेळा अामदार म्हणून ते निवडून अाले. विधान परिषदेचेही ते सदस्य हाेते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून तसेच जिल्हा कमिटीवरही त्यांनी काम केले. सातारा जिल्हा बँक, किसन वीर साखर कारखाना, जावळी सहकारी बँक अशा सातारा जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये त्यांनी माेठे याेगदान दिले हाेते.

स्वातंत्र्य लढ्यात याेगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या गाैरव ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते १९९२ मध्ये मुंबईत घडवून अाणण्यासाठी पुढाकार घेतला हाेता. तसेच  प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यासाठीही गुरुजींनी पुढाकार घेतला हाेता.
बातम्या आणखी आहेत...