आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पुण्यातील भीमपूरा गल्लीत भीषण आग; दुकानांसह 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कॅम्पमधील बाबाजान चौकातील भीमपूरा गल्लीत शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत दोन दुकानांसाह दोन घरे जाळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रात्री 2 वाजून 28 मिनिटाला भीमपुरा गल्लीत आग लागली.  कॅन्टोन्मेंटमधील अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले. परंतु आगीचे स्वरूप वाढतच असल्याने शहरातून इतर ठिकानांहूनही पाण्याचे बंब मागवण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करून जवानांनी अखेर पहाटे 3 वाजून 43 मिनिटाला आग आटोक्यात आणली. सात अग्निशामक दलाच्या गाड्या आणि तीन वॉटर टँकरच्या साहाय्याने आग विझवण्यात यश आल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...