आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, महाराष्ट्रातील सत्ताधीश भोसले घराण्याच्या अजरामर इतिहासाविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सौजन्य- मराठी विश्वकोश)

महाराष्ट्रातील भोसले घराण्याची महती केवळ देशाच्या नव्हे तर जगातिल इतिहासाच्या पानांमध्ये उमटली आहे. या घराण्याने महाराष्ट्राला सत्ताधारी केले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले. एका पेक्षा एक सरस वीर राज्याला दिले. त्यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या मातीत पराक्रमाचे अंकूर फुलले. देशावर निरंकूश सत्ता गाजवण्यात आली. इंग्रज आले नसते तर पुढेही कित्येक शतके देशावर मराठ्यांचे राज्य असते, असे म्हटले जाते. ज्या भोसले घराण्याने राज्यात शौर्याचे रोपण केले. त्याविषयी जाणून घेऊयात....
सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्यांचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजींकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढले. आदिलशाहने त्यांची नेमणूक कर्नाटकात केली. त्यांनी बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्यांचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजींच्या योग्यतेची कल्पना येते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, शहाजीराजांच्या कुटुंबाविषयी....आणि भोसले कुटुंबातील पुढील पिढ्यांसंदर्भात....