आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बिबवेवाडील 15 वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्‍ये दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या तोडफोडीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. बिबवेवाडीत पुन्‍हा एकदा 12 ते 15 गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे. अशा घटनांमुळे दहशतीत आहेत. शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पुण्यात वारंवार घडत असलेले जळीतकांड व तोडफोडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे.
- रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
- बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत याआधीही गाड्यांची तोडफोड झाली होती.
- ही घटना व्हीआयपी कॉलेज जवळील पद्मावतीमंदिरा नजीकच्या परिसरात घडली.
- या प्रकरणी पोलिसांनी एक अल्पवयीन मुलासह चार संशयितांना ताब्यात घेतले.
- स्कूल बस, आजूबाजूच्या रिक्षा आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
- घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली.
संशयितांची नावे..
- शंकर कैलास कंदेकर (वय 18, रा. बिबवेवाडी)
- सनी उर्फ ऋषीकेश अनिल शिंदे.
- शुभम आडसूळ, शिवाय एक अल्‍पवयीन.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तोडफोड केलेले वाहने..
बातम्या आणखी आहेत...