आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिग बॉस’चे घर लोणावळ्यात खाक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणासाठी लोणावळ््यात उभारलेले आलिशान घर शुक्रवारी पहाटे भीषण आगीत खाक झाले. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बिग बॉसचे सहावे सेशन नुकतेच संपल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते. लोणावळा, खोपोली तसेच आयएनएस शिवाजी येथील अग्निशामक दलाच्या सात गाड्यांच्या मदतीने अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

बिग बॉसच्या सहाव्या सीझनचा शेवटचा भाग या ठिकाणी 12 जानेवारी रोजी चित्रित करण्यात आला. सर्व सोयी-सुविधा असलेल्या या घरात बगिचा, जिम, कन्फेशन खोली, स्विमिंग पूल व शयनगृह बनवण्यात आले होते. कार्यक्रमासाठी तीन सेट उभारण्यात आले होते. त्यापैकी एका सेटवर असलेल्या इलेक्ट्रिक पॅनलमधून शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.