आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्यात 'बिग बॉस'चे घर जळून खाक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणावळा- 'बिग बॉस' या कलर्स वाहिनीवरील शोसाठी लोणावळ्यात उभारण्‍यात आलेला स्टुडिओ आज पहाटे जळून खाक झाला आहे. पहाटे पावणेपाचच्या सुमारास स्टुडिओला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्‍या 3 गाड्या घटनास्‍थळी रवाना झाल्‍या. सुमारे 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात आले. परंतु, आग भीषण असल्‍यामुळे स्‍टुडिओ खाक झाला.

लोणावळ्यातील इव्हिक्शन स्टुडिओमध्‍ये 'बिग बॉस'चा सेट उभारण्‍यात आला होता. या घरात बिग बॉसचे 6 सिझन्‍स झाले होते. सहावा सिझन नुकताच पूर्ण झाला. त्‍यामुळे घरात कोणीही नव्‍हते. त्‍यामुळे जिवितहानी झाली नाही. परंतु, सेट जळून खाक झाल्‍यामुळे मोठे नुकसान झाले आहे.