आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची क्षमता वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची वेधक्षमता आता अधिक विस्तारणार आहे. तसेच उटी येथील ‘रेडिओ टेलिस्कोप’ची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे अंतरिक्षाचा वेध घेण्याचा या दुर्बिणींचा आवाका वाढणार आहे आणि खगोल संशोधकांना सखोल संशोधनासाठी त्याची मदत होणार आहे.

पुण्याजवळच्या नारायणगाव येथील खोदड येथे एनसीआरएतर्फे जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची ‘जीएमआरटी’ची (जाएंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) उभारणी करण्यात आली आहे. तसेच तमिळनाडूतील उटी येथेही ‘उटी रेडिओ टेलिस्कोप’चे व्यवस्थापनही एनसीआरएकडे आहे. एनसीआरए (राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र) चे संचालक स्वर्णकांती घोष यांनी येथे दिली. रेडिओ दुर्बिणींची क्षमता वाढवणे, हा एनसीआरएच्या प्रकल्पाचा भाग आहे. मूळ अँटेना रचना तीच राहणार असून इलेक्ट्रॉनिक अपग्रेडेशन सातत्याने केले जाते. या दोन्ही ठिकाणी वर्षभर जगाच्या सर्व भागांतून खगोल संशोधक अभ्यासासाठी येतात. त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात अधिकाधिक अद्ययावत सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील हेतू आहे, असे डॉ. घोष म्हणाले.

द स्क्वेअर किलोमीटर आरे (एसकेए)
खगोलशास्त्रातील जागतिक स्तरावरील संशोधनात ‘एसकेए’ हा महाप्रकल्प राबवण्यात येत आहे. या महाकाय रेडिओ दुर्बिणीत नऊ अतिमहत्त्वाच्या तांत्रिक प्रणाली अंतर्भूत आहेत. त्यातील ‘डिझाइन’ (टेलिस्कोप मॅनेजर) ही जबाबदारी एनसीआरएकडे सोपवण्यात आली आहे.

खगोलशास्त्र परिषदेचे आयोजन
खगोलशास्त्राचा प्रसार-प्रचार करण्याच्या

दृष्टीने एनसीआरएच्या वतीने १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान भारतीय खगोलशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पल्बिक आऊटरिच प्रोग्रॅम’ हे परिषदेचे उद्दिष्ट आहे. या परिषदेत जगभरातील खगोल संशोधक सहभागी होत असून ३०० हून अधिक शोधनिबंध सादर होणार आहेत.
वेधक्षमता तब्बल तीस पटींनी विस्तारणा
*उटी रेडिओ टेलिस्कोपची वेध क्षमता १५ पटींनी वाढणार
*दोन्ही दुर्बिणींची ब्रँड विड्थ वाढवणार
*नव्या तांत्रिक प्रणालींचा वापर