आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ‘दुचाकी रॅली’चा फज्जा; केवळ 125 दुचाकीचालकाचा सहभाग, भाजप नगरसेवकांचीही दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शतकोत्तर रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजित दुचाकी रॅलीचा आज फज्जा उडाला. जोरदार पावसामुळे नागरिकांनी या दुचाकी रॅलीकडे पाठ फिरवली. या रॅलीत 1 हजार दुचाकीचालक सहभागी होतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात केवळ 125 दुचाकीचालक यात सहभागी झाले होते. मात्र, यासाठी नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. उरलेला नाश्ता वाया जाऊ नये म्हणून त्याचे गरीबांना वाटप करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

महापालिकेच्या मुख्य इमारती पासून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रॅलीस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास मस्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भाजप नगरसेवकांचीच दांडी 
भाजप गणेशोत्सवा ऐवजी पक्षाचेच ब्रँडीग करत आहे. असा आरोप विरोधी पक्षांनी करत या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजपने ही रॅली यशस्वी करण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली होती. त्यानुसार, महापालिकेतील पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाला 50 ते 100 दुचाकींसह कार्यकर्ते घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, 101 नगरसेवक असलेल्या सत्ताधारी भाजपचे केवळ 9 नगरसेवकच या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यातही तीन महापालिकेचे पदाधिकारी असल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे या रॅलीची पत्रकार परिषदेत माहिती देणारे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे आणि प्रशासनाचे प्रमुख महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही या रॅलीला दांडी मारली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...