आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधक डॉ. पूर्वा जोशी यांच्या संशोधनातून साकारले बायोमिमिक्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - निसर्ग हाच गुरू मानून मानवाच्या पूर्वजांनी युगानुयुगे स्वत:ची प्रगती करून घेतली. वेदकालीन मानवाने नैसर्गिक शक्तींचे स्रोत वापरून आपले जगणे अधिक उंचीवर नेले. ध्रुवीय प्रदेशातील मानवाने तेथील निमुळत्या पानांपासून स्फूर्ती घेत अतिपावसाच्या व बर्फाळ प्रदेशात उतरत्या छपरांची घरे निर्माण केली. पक्ष्यांचे अनुकरण करत विमान शोधले; पण कालौघात अनुकरण, प्रेरणा, स्फूर्ती यांच्या वाटा सोडून आपण निसर्ग ओरबाडला. त्याचे दुष्परिणाम आता आपण अनुभवतो आहोत आणि पुढील पिढ्या ते दुष्परिणाम सोसणार आहेत.

हे चित्र काही अंशी पालटण्याचा एक प्रयत्न पुण्यातील युवा संशोधक डॉ. पूर्वा जोशी यांनी केला आहे. बायो-कॉन्सेप्ट्स या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. उदाहरणार्थ कमळाच्या पानावरील तेलकट द्रावामुळे ते पाण्यात असूनही कोरडे राहते, हे दृश्य आपल्या परिचयाचे असते. या द्रावाचे रासायनिक गुणधर्म वापरून आता इमारतींसाठी वॉटरप्रूफ मटेरियल तयार केले जात आहे. निसर्गाकडून शिकता येणा-या अशा कल्पनांचा उल्लेख ‘बायोमिमिक्री’ या नावाने केला जातो, असे डॉ. जोशी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाल्या.