आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी द्यायची नव्‍हती तर पैसे कशाला घेतले, नाराज भाजप कार्यकर्त्‍यांचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उमेदवारीसाठी पैसे घेऊनही पक्षाने तिकीट दिले नाही, असा आरोप करत पुण्‍यातील भाजप कार्यकर्त्‍यांनी ऐन निवडणुकीच्‍या धामधुमीतच पुण्‍यामध्‍ये आंदोलन केले आहे. त्‍यामुळे या निवडणूकीत पारदर्शकतेचा नारा देणाऱ्या भाजपची चांगलीच गोची झाली आहे.   

जंगली महाराज रोडवरील पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्‍यांनी आंदोलन केले. उमेदवारीसाठी पक्षाने घेतलेले 11हजार रुपये परत करावेत अन्यथा उपोषण करण्‍यात येईल असा  इशारा कार्यकर्त्‍यांनी यावेळी दिला. अशा आशयाचे निषेधाचे पत्रही त्‍यांनी भाजपच्‍या लेटरहेडवर लिहीले आहे. 
 
नाराज कार्यकर्त्‍यांची समजूत काढण्‍यासाठी पुण्‍याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना मध्‍यस्‍थी करावी लागली.  उमेदवारी द्याचीच नव्‍हती तर पैसे कशाला घेतले असा प्रश्‍न करत नाराज कार्यकर्त्‍यांनी गिरीश महाजन यांच्‍याशी हुज्‍जत घातली. कार्यकर्त्‍यांची समजूत घालताना बापट यांनी इच्‍छुक उमेदवारांकडून घेतलेले पैसे पक्षनिधीमध्‍ये जमा करण्‍यात आले आहे, असे सांगितले. त्‍यामुळे पुणे महापालिकेत भाजपने इच्‍छुक उमेदवारांकडून पक्षनिधीच्‍या नावाखाली खरेच पैसे उकळले का? असा प्रश्‍न आता उपस्थित आहे.      
बातम्या आणखी आहेत...