आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना वृत्तपत्रावर बंदी घालू देणार नाही -भाजप नेते व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर बंदी घालण्याच्या भाजपच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी मात्र विरोध केला आहे.
 
यासंदर्भात व्यंकय्या नायडू म्हणाले, की सामना या वृत्तपत्रावर बंदी घालू नये. मला ही भूमिका पटलेली नाही. मी तसे होऊ देणार नाही. शिवसेनेला जे लिहायचे आहे ते लिहू द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिहित असतील तर वृत्तपत्र आपली पातळी घालवेल. सरकारमध्ये सोबत राहायचे. सोबत राज्यकारभार करायचा. एकमेकांवर गंभीर आरोप करायचे हे चुकीचे आहे. आपण शब्द काळजीपूर्वक वापरायला हवेत. सत्ता जात असल्याचे बघून शिवसेनेच्या पायाखालची पाळू घसरत आहे. सध्या भाजप मोठा भाऊ आहे हे शिवसेनेने लक्षात घ्यावे. मुंबई महापालिकेत भाजपला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही.
 
निवडणूक आयोगाने सामनाला पाठवले पत्र
भाजपच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी सामनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला एक पत्रही पाठवले आहे. त्यावर आयोगाने येत्या तीन दिवसांत भूमिका मांडा असे पत्र सामनाला पाठवले आहे. आता शिवसेना यावर काय भूमिका घेणार याची लोकांना प्रतिक्षा आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा... उद्धव ठाकरे म्हणाले- ही तर आणीबाणी... सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मांडली सडेतोड भूमिका....
बातम्या आणखी आहेत...