आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक कासरवाडीत सुरु, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

बैठकीत पक्ष संघटनेच्या आढाव्या सोबतच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वेब पोर्टल 'महाकरिअरमित्र', हेल्पलाईन, मोबाईल अॅपचे उद्‌घाटन होणार आहे. दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...