आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Mla Sambhaji Pawar Vs Sanjay Patil Drama In Sangli

गुंडाला उमेदवारी देऊन \'भ्रष्टाचारमुक्त भारत\' कसा घडेल? भाजपला घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- अनेक गुन्हे दाखल असलेला, मारामारीचे, दरोडे टाकलेला, भ्रष्टाचार केलेला व जमिनी व प्लॉट बळकाण-या गुंडाला व पक्षात दोन दिवसापूर्वी आलेल्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देऊन नरेंद्र मोदी व भाजपने दिलेला 'भ्रष्टाचारमुक्त भारत' कसा घडेल, असा घरचा आहेर भाजपचे आमदार संभाजी पवार यांनी दिला आहे. मी भाजपचा किंवा आमदारपदाचा राजीनामा देणार नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत गुंड संजय पाटील यांचा प्रचारही करणार नाही अशी स्पष्ट भूमिकाही पवार यांनी घेतली आहे. संजय पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध कायम असल्याचे सांगण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली व आपली भूमिका जाहीर केली.
आमदार संभाजी पवार म्हणाले, संजय पाटील यांची उमेदवारी पक्षाने मागे घ्यावी, या मतावर मी ठाम आहे. मूळात अशा गुंडाला पक्षातच घेणे चुकीचे आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाणार आहे. मात्र अशा ऐ-यागै-यांसाठी मी देऊ केलेला राजीनामा मागे घेतला आहे. मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. या काळात मी तत्वाने राहिलो व वागलो. कधी भ्रष्टाचार केला नाही कायम प्रामाणिकपणे काम केले. लोकसभेसाठी माझे हे तत्त्व जरी बाजूला ठेवले तरी भाजपच्या तत्त्वांचे, नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे काय? भाजपने भ्रष्टाचार मुक्त भारत, कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा केली आहे. त्यात संजय पाटील कुठे बसतात? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, मारामारीचे, दरोड्याचे गुन्हे आहेत. दीडशे कोटींचा तासगाव कारखाना 14 कोटींत घशात घालण्याचा प्रयत्न केला. 27 हजार शेतकरी, सभासदांना देशोधडीला लावले. प्रा. एन. डी. पाटील यांनी हस्तक्षेप केल्याने संजय पाटलांना कारखाना सोडावा लागला. अशा गुंड माणसांऐवजी पक्षातील कोणत्याही साध्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी भाजपचा विजय निश्चित होता तरीही आयात उमेदवाराची काय गरज भासली असे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला.
मुंडे-शेंडगेंच्या खेळीने संभाजी पवार अस्वस्थ... वाचा पुढे....