आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MP Satyapal Singh News In Marathi, Pune, Maharashtra Cm

महाराष्ट्रात भाजपचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, सत्यपाल सिंह यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकांच्यालोकप्रतिनिधीकडून फार मोठ्या अपेक्षा असून त्या सर्वांचे समाधान राजकारणी करू शकत नाहीत. त्यामुळे राजकारणी होणे कठीण काम असून निवडून आल्यानंतर राजकारण्यांबद्दल माझ्या मनात सन्मान वाढला आहे. महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार असून मला प्रचाराकरिता विचारणा होत आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार असला तरी महाराष्ट्रात भाजपचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे मत भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.

पुणे पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, खजिनदार मंगेश कोळपकर उपस्थित होते.

सत्यपाल सिंह म्हणाले, मुंबई पोलिस आयुक्त होणे ही पोलिस दलात मोठी गोष्ट असते. आतापर्यंतच्या आयुक्ताच्या इतिहासात मी प्रथमच पदाचा राजीनामा देऊन राजकारणात गेलेली व्यक्ती आहे. राजकारणात जाण्यापूर्वी मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी चर्चा करून सल्ला घेतला होता. त्यांनी मला राजकारण कठीण काम असल्याचे सांगितले होते. मुंबईतून निवडणूक लढण्यासाठीही मला विचारणा झाली होती. मात्र, बागपतमधून मी निवडणूक लढण्याचे ठरवले होते. भाजपशी माझे अनेक वर्षापासून संबंध आहेत, असे म्हणणे अयोग्य आहे.
माझी विचारधारा मानवधर्माची
पोलिस सेवेत असताना आत्ताही माझी विचारधारा ही मानवतेची आहे. सर्वांसाठी काम सर्वांना समान न्याय हे माझे तत्त्व आहे. लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र, जातिभेद, धर्मभेद झाला नाही पाहिजे. मी राजकारणी नसून एक उद्देश घेऊन राजकारणात आलो आहे. देशात दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून भाजप केवळ विकासाच्या अजेंडावर निवडणूक लढल्याचे सिंह म्हणाले.