आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपची खास वॉररूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या आधारे केवळ माहितीची देवाणघेवाण न करता स्थानिक मतदान केंद्राच्या पातळीवरील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या या वॉररूममधून भाजपाच्या स्टार प्रचारकांपासून सामान्य कार्यकर्त्यांच्या सभा, कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती या वॉररूमचे प्रमुख आणि पक्षाचे राज्यातील निवडणूक प्रचार अभियान प्रमुख श्रीकांत भारतीय यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रवक्ते श्रीपाद ढेकणे, राजेश पांडे, गणेश बिडकर, मेधा कुलकर्णी, मंदार घाटे आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय म्हणाले, “वॉररुममध्ये आठ विभाग तयार करण्यात आले असून त्यात काम करणा-या 260 कार्यकर्त्यांना आठ दिवस प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोशल मीडिया, सभा, दौरे, प्रचार व प्रसार, प्रसारमाध्यमे, अॅडव्होकेट, हिशोबनीस, कार्यलयीन कामकाज, मोदी परिवार असे विभाग वॉररूममध्ये आहेत. त्याचे उद्घाटन भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी नुकतेच केले. भाजपचे कार्यकर्ते आणि काही प्रोफेशनल्स यांच्या एकूण 78 जणांच्या टीमकडून संघटनात्मक पातळीवर संपर्क, सोशल मीडियामार्फत संशोधन, प्रसारमाध्यांशी समन्वय असे विषय हाताळले जात आहेत. या सर्व उपक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे.”
“राज्यातील 24 मतदारसंघांमधून 95 हजार नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी व प्रचारासाठीची स्वतंत्र फौज वॉररूमच्या माध्यमातून झाली आहे. उदाहरणार्थ नांदेडला नुकत्याच झालेल्या सभेपूर्वी 18 ते 21 वयोगटाच्या तरुणांपर्यंत सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संपर्क व संवाद साधण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून मोदी यांच्या या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. वॉररूमकडून या प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांशी रोज रात्री संपर्क साधण्यात येतो व त्यांना त्यांच्या मतदारांकडून आलेला अभिप्राय कळविण्यात येतो,” असेही भारतीय यांनी यावेळी सांगितले.
पुढे वाचा, मोदींच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी निवडणूक आचारसंहितेत सुधारणेसाठी याचिका दाखल करणार...