आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP State President Devendra Fadanvis Comment On Congress And NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतंत्र विदर्भाबाबत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे धोरण कायम दुटप्पी; फडणवीस यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्वतंत्र विदर्भाला भारतीय जनता पक्षाचा पहिल्यापासून पाठिंबा तर शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे त्याबाबत दुटप्पी धोरण आहे. स्वतंत्र विदर्भ झाल्यास कॉँग्रेस राज्यात राहणार नाही, अशी भीती त्यांना वाटते तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे याप्रश्नी सोयीचे राजकारण करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना देशात यश मिळणार नाही असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यात परिस्थिती खालावली असून त्यांनी देशाचे काम सोडून पुन्हा राज्यात सक्रिय व्हावे. देशातील परिस्थिती पाहण्यास मोदी सक्षम आहेत. भाजप छोटा राज्यांचा सर्मथक असून एनडीएच्या काळात तीन राज्ये विकासाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आली. भाजप लोकशाही पद्धतीने काम करत असून जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा छोटी राज्ये करू. स्वतंत्र विदर्भाच्या नेतृत्वासाठी समाजसेवक प्रकाश आमटे यांचे नाव पुढे येत असून त्यांनी नेतृत्व केल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. लेखिका शोभा डे यांच्या स्वतंत्र मुंबईला आमचा कायम विरोध असून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करता येणार नाही. तसा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडण्यात येईल, असेही ते म्हणाले.