आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रीपद मिळवायचेच! भाजपच्या निर्धाराला अमित शहांच्या वक्तव्याने दुजोरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महायुती होऊ अथवा तुटो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद मिळवायचेच असा निर्धार भाजपने केल्याचे वारंवार दिसून येत आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही कोल्हापूरात भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार आणा असे सांगत तसे स्पष्ट केलेच आहे. त्यासाठी भाजपने जागावाटपासाठी आणखी एक फॉर्म्यूला पुढे आणला आहे. त्यानुसार शिवसेनेला 145, भाजपला 125 तर मित्रपक्षांना 18 जागा हा नवा फॉर्म्यूला भाजपच्या सोयीचा फॉर्म्यूला तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांत फक्त 20 जागांचा फरक राहतो. जागा कमी असल्या तरी शिवसेनेपेक्षा जास्त जागा कशा जिंकता येतील हे धोरण ठेवायचे त्याचबरोबर मित्रपक्षांतील शेट्टी-आठवले-जानकर यांना केंद्रांत स्थान देण्याचे वचन देऊन त्यांना आपल्या कंपूत ओढायचे असा डाव भाजपने आखला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी 150 पेक्षा एकही कमी जागा घेणार नसल्याचे ठणकावून सांगत राज्यातील सर्व 288 जागांवर चाचपणी करण्याचे धोरण कायम ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला ना भूतो ना भविष्याती असे यश मिळाले. त्यानंतर लागलीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रातही भाजपला जोरदार यश मिळाले. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते सातवे आसमानवर आहेत. लोकसभेला भाजपने 24 जागा लढवल्या आणि तब्बल 23 जागा जिंकल्या. सेनेने 21 जागा लढल्या आणि 18 जागा जिंकल्या. त्यामुळे सेनेपेक्षा भाजपला मानणारा वर्ग राज्यात मोठा आहे त्याच आधारावर विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या व आपला मुख्यमंत्रीपद मिळवायचे हा भाजपचा निर्धार आहे. मोदी व शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहे.
महाराष्ट्रासारख्या देशातील क्रमांक 1 चे राज्य भाजपकडे आल्यास पक्षाला त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल अशी भाजपची त्यामागे अटकळ आहे. याचबरोबर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आजही मोठे जाळे आहे व संघटनात्मक पातळीवर ताकद आहे. हे जाळे उद्धवस्त करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे याची जाणीव प्रदेश भाजपसह राष्ट्रीय नेत्यांनाही आहे. त्यामुळेच भाजपला राज्यात वर्चस्व आहे. मात्र, भाजपची सत्तेची लालसी वृत्ती शिवसेनेला अजिबात रूचली नसून, उद्धव ठाकरेंनी 150 पेक्षा एकही कमी जागा घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. याचबरोबर भाजपला दगाफटका करेल यासाठी राज्यभरातील सर्व नेते-पदाधिका-यांना मुंबईत सेना भवनात बोलावून मुलाखती सुरु केल्या आहेत. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सेनेचाच होईल व शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालीलच महाराष्ट्रात सरकार येईल असे सांगत शिवसेना मोडेल पण वाकणार नाही असे सांगत मराठीबाणा दाखवला आहे.