आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मिशन लोकसभे’साठी भाजपचे पुण्यात चिंतन, 3 व 4 सप्टेंबरला प्रदेश कार्यकारिणीची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत भाजपने 3-4 सप्टेंबरला पुण्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून पक्षाची ही पहिलीच प्रदेश बैठक आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. भाजपचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदी सुमारे साडेसहाशे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित राहणार आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील मित्रपक्षांच्या मोजक्या प्रमुखांनाही उद्घाटन सत्रात सामावून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


पुणे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी सांगितले, की निवडणुकीची रणनिती ठरवण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली आहे.महाराष्ट्रातील ढासळती कायदा सुव्यवस्था, राजकीय स्थिती, आर्थिक संकट या विषयांवरही मार्गदर्शन होणार आहे.


या नेत्यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेली नाराजी मतांच्या रूपाने भाजपकडे आणण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत.