आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली : शोभेची दारू बनवणा-या इगल कारखान्यात स्फोट, 11 कामगारांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - येथील शोभेची दारु बनवणा-या इगल कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात सोमवारी नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता तर आज सकाळी (मंगळवारी) आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर कारखान्याला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मृतात कंपनीच्या मालकाच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.
दरम्यान कारखान्यात आणखी कामगार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.