आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्‍ये डांगे चौकात स्‍फोट, लहान मुलगा जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्‍यात साखळी स्‍फोटांची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड एक लहान स्‍फोटाने हादरले आहे. डांगे चौकात हा स्‍फोट झाला. प्राप्‍त माहितीनुसार एक लहान मुलगा त्‍यात जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बॉम्‍बशोधक पथक घटनास्‍थळी रवाना झाले आहे.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, डांगे चौकातील लक्ष्‍मीतारा इमारतीच्‍या पाय-यांवर हा स्‍फोट झाला. जखमी झालेल्‍या मुलाचे नाव पियुष असे आहे. तो गंभीररित्‍या जखमी झाला असून त्‍याला यशवंतराव चव्‍हाण रुग्‍णालयात आयसीयुमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा स्‍फोट 'आयईडी'द्वारे घडविण्‍यात आलेला नाही, असे पोलिसांचे म्‍हणणे आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्‍ल्‍याचा प्रकार नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. परंतु, अधिकृतरित्‍या कोणीही माहिती दिलेली नाही. स्‍फोट कशामुळे झाला, यासंदर्भात तपास घेण्‍यात येत आहे. प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार, इमारतीच्‍या पाय-यांवर काही साहित्‍य ठेवण्‍यात आले होते. ते या मुलाने उचलताच स्‍फोट झाला.
पुण्‍यात 31 जुलै रोजी जंगली महाराज मार्गावर चार स्‍फोट झाले होते. त्‍यात मोठ्या प्रमाणांवर स्‍फोटकांचा वापर करण्‍यात आला. सुदैवाने स्‍फोटकांचे मिश्रण योग्‍यप्रकारे झाले नाही. त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला.