आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी व्हॉटसअॅपमुळे झाले होते जगणे मुश्किल आता मिळाला त्यामुळेच आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंध दांपत्यास मदत करणारे पिंपळे गुरव येथील मयुरीनगरी वसाहतीमधील नागरिक. - Divya Marathi
अंध दांपत्यास मदत करणारे पिंपळे गुरव येथील मयुरीनगरी वसाहतीमधील नागरिक.
पुणे- व्हॉटसअॅपवर पोस्ट व्हायरल झाल्याने जगणं मुश्किल झालेल्या अंध दाम्पत्याला आता व्हॉटसअॅपमुळेच मदतीचा हात मिळाला आहे. व्हॉटसअॅपच्या या दोन्ही बाजू पिंपरी-चिंचवडमधील लोखंडे दाम्पत्याने अनुभवल्या आहेत. धर्मेंद्र आणि शीतल लोखंडे हे दोघे एका चौकात त्यांची गोंडस मुलगी समृद्धीला घेऊन बसले होते. मात्र एका समाजकंटकाने ही मुलगी त्याची नसल्याचा तर्क लावला आणि एका पोस्टसह फोटो व्हायरल केला होता.
 
याच पोस्टने त्यांचे जगणे मुश्किल झाले होते. याची माध्यमांनी दखल घेतली होती. व्हॉटसअॅपवर जशी चुकीची पोस्ट व्हायरल झाली तशीच त्यांचे जगणे मुश्किल झाल्याची बातमीही व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी आता अनेक हात पुढे येत आहेत.
 
पिंपळे गुरवमधील मयूरनगरी वसाहत समृद्दीच्या लग्नापर्यंतचा आणि कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न भागवणार आहेत. यावेळी त्यांना अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर फिरणारा एक मेसेज एका अंध दांपत्याचा जीवनात अडथळा बनत होता मात्र तोच मेसेज आता या अंध दांपत्याच्या जीवनात नवसंजीवनी घेऊन आला आहे. 
 
धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे अशी या दोघांची नावे आहेत. या अंध दांपत्याला समृद्धी ही तीन वर्षाची मुलगी आहे. तिचा शिक्षणासह लग्नापर्यंतचा खर्च आणि कुटुंबातील अंध आई-वडिलांचा खर्च पिंपळे गुरव येथील मयुरीनगरी वसाहत करणार आहे. या मदतीमुळे शीतल आणि धर्मेंद्र खूप खुश आहेत. ज्यामुळे त्रास झाला, त्याच व्हॉटसअॅपने नवसंजीवनी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच बरोबर व्हॉटसअॅपवर मेसेज फॉरवर्ड करताना तो चुकीचा तर नाही ना याचा विचार करून तो पाठवावा असे आवाहन अंध दांपत्याकडून करण्यात आले आहे.
 
हेही वाचा-