आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्लू व्हेल’ चॅलेंजचे शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी 7 वीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/पुणे- जगभरात सुसाइड गेम म्हणून चर्चित ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात अडकून मुंबईत एका मुलाने आत्महत्या केली होती. आता इंदूर आणि महाराष्ट्राच्या सोलापूरमध्येही मुले या जाळ्यात अडकल्याची प्रकरणे समोर आली आहेत. दोन्ही मुलांना वाचवण्यात वेळीच यश आले.

इंदूरमधील ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ या जीवघेण्या खेळाचे शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी ७ वीचा विद्यार्थी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्यास निघाला होता, पण मित्रांनी ते पाहिले आणि त्याला मागे खेचले. गोंधळ ऐकून वर्गात उपस्थित क्रीडा आणि शारीरिक प्रशिक्षक व शिक्षक आले आणि  विद्यार्थ्याची समजूत काढली. ही घटना गुरुवारी चमेलीदेवी पब्लिक स्कूलमध्ये घडली. विद्यार्थ्याला समुपदेशनासाठी प्राचार्यांकडे नेण्यात आले. दोन तास समुपदेशन चालले. हा विद्यार्थी ५० दिवसांपासून वडिलांच्या मोबाइलमध्ये हा गेम खेळत होता आणि शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी आत्महत्या करत होता. हा विद्यार्थी सिलिकॉन सिटीत राहत होता. वडील पिथमपूरच्या एका ऑटोमोबाइल कंपनीत आहेत. वडिलांच्या मोबाइलमध्ये ते ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेम डाऊनलोड करून खेळत होता. त्याने आपल्या डायरीत या गेममध्ये पास झालेल्या ५० पायऱ्यांची माहिती लिहिली होती. देशात अशी ही दुसरी घटना समोर आली आहे. त्याआधी ३१ जुलैला मुंबईत १४ वर्षीय मुलाने टास्क पूर्ण करण्यासाठी सहामजली इमारतीवरून उडी मारून जीव दिला होता.

अाज शेवटचे टास्क; मी मरून जाईन 
अाज शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी मला जीव द्यायचा हाेता.  मला उंचावरून उडी घेऊन जीव द्यायचा अाहे, असे मी मित्रांनादेखील सांगितले हाेते. खेळाची प्रत्येक स्टेप पूर्ण केल्यानंतर मी त्याची डायरीत नाेंद करत हाेताे; परंतु माझी डायरी हरवली. त्यामुळे मी गुगलवर या खेळाच्या शेवटच्या स्टेपचे अाॅप्शन शाेधले, त्यात लिहिले हाेते...तुम्हाला उंचावरून उडी मारायची अाहे. त्यानुसार मी हे करत हाेताे. 

शेवटचे टास्क मुलांचे नव्हे, तर तुमचेच...
जगभरातील २०० हून अधिक मुलांना मृत्यूच्या खाईत लाेटणाऱ्या ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ने गुरुवारी इंदूरमध्येही एका मुलाचा जीव घेण्याची तयारी केली हाेती. मात्र, सुदैवाने त्या वेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवले. या गेममध्ये शेवटच्या दिवशी गेम खेळणाऱ्याला छतावरून उडी मारून अात्महत्या करण्यास सांगितले जाते. या स्टेपला शेवटचे टास्क म्हटले जाते. कारण यानंतर केवळ मृत्यू अाहे. मात्र, सर्वात माेठा प्रश्न हा अाहे की, खराेखर हे या मुलाचे शेवटचे टास्क अाहे? शेवटी हा मुलगा कुटुंब व शिक्षणात काय शाेधत अाहे? ताे जे शाेधत अाहे, ते अापण खराेखर त्याला देत अाहाेत काय? कदाचित नाही. ताे जीवन व मृत्यूमध्ये कुटुंबाचे प्रेम व ‘काळजी’ शाेधत हाेता. त्यामुळे अाता अाई-वडील व कुटुंबासाठी जागे हाेण्याची वेळ अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...