आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल गेम \'ब्लू व्हेल\'चा टास्क पूर्ण करण्यासाठी सोडले घर, एअरपोर्टवर करायचे होते हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/पुणे- जगभरात सुसाइड गेम म्हणून चर्चित ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात अडकून मुंबईत एका मुलाने आत्महत्या केली होती. आता सोलापूर आणि मध्यप्रदेशातील इंदूरमध्येही मुले या जाळ्यात अडकल्याची प्रकरणे समोर आली आहेत. दोन्ही मुलांना वाचवण्यात वेळीच यश आले.

पुणे एअरपोर्टवर करायचे होते हे काम...
सोलापुरातील एक 14 वर्षीय मुलगा घराबाहेर पडला. एसटीत बसून भिगवणपर्यंत पोहोचला.
ब्ल्यू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्‍यासाठी तो पुण्याच्या दिशेने एसटी बसने निघाला होता. 
पुणे एअरपोर्टमध्ये घुसून त्याला सेल्फी घेऊन त्याला टास्क पूर्ण करायचा होता. दरम्यान, तो 'ब्ल्यू व्हेल गेम'मध्ये फसल्याचे पालकांच्या लक्षात आले. धावाधाव सुरू झाली अन् पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात यश आले. याच गेमच्या नादात एका मुलाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला होता. दिवसेंदिवस या गेमचे मुलांमध्ये आकर्षण वाढत असताना बुधवारी साेलापुरातील एक मुलगा या जाळ्यात फसल्याचे समोर आले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा.. जुळे सोलापुरातील शाळेत नववीत शिकतो मुलगा...
बातम्या आणखी आहेत...