आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Doctor Sushma Kothari Arrested, Dr. Dabholkar Disclosed His Fraud

बोगस डॉक्टर सुषमा कोठारी यांना अटक, डॉ दाभोलकरांनी केले होते पितळ उघडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी न करता वैद्यकीय व्यवसाय करणा-या बोगस डॉक्टर सुषमा कोठारी यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीच चार महिन्यांपूर्वी कोठारी यांचे पितळ उघडे पाडले होते. या प्रकरणी कोठारींवर विश्रामबाग पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.व्ही. माने यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अ‍ॅक्युपंक्चर उपचाराच्या नावाखाली कोठारी रुग्णांची दिशाभूल करत होत्या. गंभीर आजारांवर उपचार करण्याचे सांगत त्यांनी रुग्णांची फसवणूक चालवली होती. त्यांची तक्रार डॉ. दाभोलकर यांनी पोलिस व पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले होते.
त्यानुसार विभागीय अधिकारी अमृता अशोक इंगळे (52) यांनी कोठारींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर अटक टाळण्यासाठी कोठारी यांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दुसरा अर्ज केला. उच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच या प्रकरणाची चौकशीही सुरू झाली होती.
लोहिया हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस
पुण्याच्या नवी पेठेतील निंबाळकर तालीमजवळील लोहिया हॉस्पिटलमध्ये कोठारी 20 डिसेंबर 2012 पासून काम करत आहेत. फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्यांची कॉस्मेटिक विषयात पीएचडी असून, रुग्णांची दिशाभूल करतानाच कोठारी शासकीय अधिका-यांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट 1961 नुसार गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.