आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांजणगाव मंदीरात बॉम्बच्या अफवेने गोंधळ, नंतर समजले पोलिसांकडून मॉक ड्रील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महागणती रांजणगाव परिसरात आज (ता. 21 ) रोजी बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली. परंतु, नंतर हे सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेले मॉक ड्रील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आणि उपस्थित सर्व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.सुरक्षेच्या दृष्टीने हे मॉक ड्रील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या शाळांना नातळच्या सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. भविष्यात अशी काही अप्रिय घटना घडू नये यासाठी मंदीरातील सुरक्षेची चाचपणी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नुकतेच झालेले सिडनी येथील ओलिस नाट्य आणि पेशावर येथील मिलेट्री स्कुलवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने सर्व ठिक़ाणांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.