आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील शिवाजीनगर स्टेशनमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र, त्यात बॉम्ब नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.

मात्र, त्यापूर्वी भीतीमुळे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने शिवाजीनगर रेल्वे स्टेशन व पुणे स्टेशन मोकळे केले होते. पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने शिवाजीनगर रेल्वे स्टेशनमधील बॅग ताब्यात घेतली असून, ती जवळच्याच एसएसपीएम कॉलेजच्या मागील मोकळ्या मैदानात बॅग नेली असून तेथे ती बॅग तपासण्यात येत असून निकामी करण्यात आली. त्यात वायर, फोन व इतर सामान सापडले आहे. त्यामुळे चार तास चाललेला गोंधळ अखेर थांबला. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन चार तासांनी प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.