आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकाच्या सजावटीसाठी आता मिळणार पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आधुनिक काळात ग्रंथनिर्मिती व्यवहारात लेखक, प्रकाशकाइतकेच महत्त्व ग्रंथ सजावटकार तथा डिझायनरलाही असते. मात्र, लेखक-प्रकाशकांना विविध कारणांनी गौरवले जाते. सजावटकारांचे क्षेत्र मात्र दुर्लक्षित होते. ही कमी आता भरून निघणार आहे. त्यासाठी ‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ने पुढाकार घेतला आहे. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त सहकार्याने या वर्षीपासून ग्रंथाच्या सजावटकारास, मुखपृष्ठकारास विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी ही माहिती दिली. ‘राजहंस परिवारातील साहित्यप्रेमी रेखा ढोले यांचे नुकतेच निधन झाले. पुस्तक निर्मिती, सजावट याविषयी विचक्षणता असणाऱ्या ढोले यांच्या स्मृत्यर्थ ढोले परिवार आणि राजहंस यांनी एकत्रितपणे ग्रंथाचे निर्मितीमूल्य, सौंदर्यमूल्य वाढवणाऱ्या सजावटकाराचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आगामी पाच वर्षांसाठी हे पुरस्कार दिले जातील,’ असे डॉ. बोरसे म्हणाले. पहिला पुरस्कार सोहळा १७ मे रोजी पुण्यात होईल. या वेळी ‘पत्रकारिता आणि व्यावसायिकता’ विषयावर डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान होईल.

एकूण तीन पुरस्कार
१)ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील सजावटकाराला रेखा ढोले स्मृती पुरस्कार : वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांमधून निर्मितीमूल्यांच्या निकषांवर सर्वोत्तम ठरणाऱ्या पुस्तकाच्या सजावटकाराला १५ हजार रुपयांचा पुरस्कार
२) ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या संस्थेला १० हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार
३) अनुवाद क्षेत्रातील योगदानासाठी रेखा ढोले स्मृती पुरस्कार २५ हजार रुपये. अन्य भाषांमधून मराठीत साहित्यानुवाद करणाऱ्या अनुवादकाला दिला जाईल.

'उपरोक्त'चे मानकरी
१) सजावटकार: नितीनदादरावाला
पुस्तक : प्रतिमा आणि प्रचिती
२)प्रकाशन संस्था : लोकवाङ्मय गृह प्रकाशन
३)अनुवादक पुरस्कार : उमा कुलकर्णी