आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Book Publisher Boycott On Marathi Sahitya Sammelan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुमान मराठी साहित्य संमेलन : बहिष्काराच्या निर्णयावर मराठी प्रकाशक ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंजाबमधील घुमान येथे एप्रिल महिन्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय राज्यभरातील प्रकाशकांनी सोमवारी पुण्यातील बैठकीत घेतला. सुमारे २५० मराठी प्रकाशकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातून कोणीही मराठी प्रकाशक घुमानला जाणार असल्याचे प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले.

अमराठी राज्यात हे संमेलन होत असल्याने त्याठिकाणी मराठी पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे संमेलन महाराष्ट्रातच घेण्यात यावे, अशी मागणी राज्यभरातील प्रकाशकांनी सुरूवातीपासून लावून धरली होती. मात्र साहित्य महामंडळाने घुमान येथेच संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. महामंडळ व संमेलन आयोजकांच्या या भूमिकेमुळे प्रकाशकांनीही बहिष्काराचा निर्णय घेतला होता. सोमवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.