आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथविक्रीचे उड्डाण चार काेटींचे, पुस्तक खरेदीसाठी तरुणाईची माेठी गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा-तुकारामनगरी - साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला वाचनप्रेमींनी गेल्या चार दिवसांत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा विक्रमी चार काेटी रुपयांपर्यंत ग्रंथविक्री झाल्याचा अंदाज अाहे. विशेषत: तरुणाईचा ग्रंथखरेदीचा उत्साह अपूर्व होता, असे निरीक्षण अनेक प्रकाशकांनी नोंदवले आहे.

ग्रंथप्रदर्शन हा साहित्य संमेलनातला महत्त्वाचा घटक मानला जातो. एरवी छोटी शहरे, ग्रामीण भागात एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकखरेदीची संधी वाचकांना मिळत नाही. संमेलनस्थळी असणाऱ्या ग्रंथप्रदर्शनात अशी संधी मिळत असल्याने नेहमीच वाचकांचा ओढा ग्रंथप्रदर्शनाकडे असतो. गेल्या वर्षी ८८ वे साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे झाल्याने तेथे मराठी भाषक नसल्याने प्रकाशकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली होती. यंदा मात्र दोन वर्षांचा अनुशेष भरून काढण्याच्या ईर्षेनेच प्रकाशक ग्रंथप्रदर्शनात उतरले होते. तब्बल ४०० ग्रंथविक्री दालने यंदाच्या संमेलनात होती. या सर्व ग्रंथदालनांना वाचकांनी प्रचंड गर्दी आणि खरेदी करून प्रतिसाद दिला.
या पुस्तकांना मागणी
राऊ, हीच श्रींची इच्छा, हिंदू, लाेक माझे सांगाती, प्रकाशवाटा, नटसम्राट, एकटा जीव, जेरुसलेम- एक चरित्र कथा, ९६ कुळी या पुस्तकांना संमेलनात अधिक मागणी हाेती, अशी माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली. यापैकी राऊ व नटसम्राट या कादंबरीवर अाधारित नुकतेच अनुक्रमे ‘बाजीराव- मस्तानी’ व ‘नटसम्राट’ हे चित्रपट अालेले अाहेत. त्यामुळे तरुणांची या दाेन कादंबऱ्यांना विशेष मागणी हाेती. तर लाेक माझा सांगती हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय अात्मचरित्र अाहे.