आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोपखेल: गावक-यांसाठी महापालिकेने स्वतंत्र पूल बांधावा- मनोहर पर्रीकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बोपखेल-दापोडी हा रस्ता नागरिकांसाठी खुला करता येणार नाही. यासाठी महापालिकेने स्वतंत्र पूल बांधावा अशी भूमिका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, हा विषय मार्गी लावण्यासाठी पुण्याचे जिल्ह्याधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसवर पर्रीकर यांच्या उपस्थितीत बोपखेल गावातील ग्रामस्थ, पुण्यातील स्थानिक आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांची आज दुपारी तीन वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर पर्रीकर यांनी ही माहिती दिली.
लष्कराच्या हद्दीतील दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (म्हणजेच सीएमई)मधूनच बोपखेल -दापोडी या दोन गावांना जोडणारा रस्ता जातो. मात्र, मागील अनेक वर्षे रस्ता वापरणा-यांवरून सीएमई आणि बोपखेलमधील ग्रामस्थ यांच्यात वाद सुरू आहे. बोपखेलमधील ग्रामस्थ हा रस्ता काही अटी-शर्तींवर वापरत आहेत. मात्र, अधून-मधून लष्कराच्या नाहक त्रासाला गावक-यांना समोरे जावे लागते. यातूनच हा वाद कोर्टात गेला.
सीएमईने हा भाग संवेदनशील असल्याचे कोर्टात सांगितल्याने कोर्टाने हा रस्ताच बंद करण्याचा आदेशा दिला. त्यामुळे 12 मे रोजीपासून बोपखेल- दापोडी रस्ताच सीएमईने बंद केला. त्यामुळे मागील आठवड्यात सीएमई, पोलिस व ग्रामस्थ यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 200 ग्रामस्थांना अटक करून येरवडा जेलमध्ये टाकले होते. याचा उद्रेक मोठा झाला व राज्यभर याची चर्चा झाली.
अखेर बोपखेलच्या ग्रामस्थांनी अण्णा हजारे यांच्यासह शरद पवार यांना साकडे घातले. अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली तर पवारांनी थेट पर्रीकर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती केली. यावर पर्रीकर यांनी तत्काळ वेळ बोपखेल ग्रामस्थ, सीएमईचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली. ही बैठक पुण्यात सर्किट हाऊसमध्ये आज दुपारी तीन वाजता पार पडली. यात ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली तसेच हा गाव रस्ता लष्कराकडे अद्याप हस्तांतरित झाला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
बातम्या आणखी आहेत...